सारिका महोत्रा ब्रँडिंग आणि इमेज मेकिंग मधलं एक मोठं नाव. इमेज मॅनेजमेंट आणि सॉफ्ट स्किलच्या माध्यमातून अवघ्या देशाला परिचयाचे असणाऱ्या सारिका महोत्रा ह्या मूळच्या कोल्हापूर येथील आहेत. कोल्हापूरमध्ये प्राथमिक शिक्षण घेत पुण्यामध्ये सारिका यांनी आपलं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. पुढे त्यांनी इमेज मेकिंगच्या अभ्यासासाठी दिल्ली निवडली. दिल्लीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांसोबत त्यांनी इमेज मेकिंगसाठी काम केलं. संस्था राजकीय व्यक्तिमत्व आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक उपक्रमात सारिका यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.आज सकाळ मीडिया ग्रुपच्या 'सक्सेस पासवर्ड' शोमध्ये सकाळचे संपादक संदीप काळे यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्याचे अनेक गमक मांडले आहेत. चला तर मग सहभागी होऊया ‘सक्सेस पासवर्ड’ विथ संदीप काळे.